इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – माऊंट आबू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयने आज एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. कुमारी बबिता उर्फ देवकी, बंधू द्वारिका व बंधू शाम यांनी “ओम मंडळी शिवशक्ती अवतार सेवा संस्था, रायपूर, छत्तीसगड या संस्थेचा आणि ब्रह्माकुमारी संस्थेशी कोणताही संबंध नाही, असे विश्वविद्यालयाने स्पष्ट केले आहे.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविदयालय, मुख्य कार्यालय पांडव भवन, माऊटआबू, राजस्थान ही एक नामांकित अध्यात्मिक कार्य करणारी संस्था आहे. ही संस्था 1937 पासून कार्यरत आहे. कुमारी बबिता उर्फ देवकी, बंधू द्वारिका व बंधू शाम यांनी “ओम मंडळी शिवशक्ती अवतार सेवा संस्था, रायपुर, छतीसगड या नावाने संस्था काढली आहे. ते ब्रह्माकुमारी संथेचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ते चुकीचे आबे. कुमारी बबिता उर्फ देवकी, बंधू द्वारिका व बंधू शाम यांनी “ओम मंडळी शिवशक्ती अवतार सेवा संस्था, रायपुर, छत्तीसगड या संस्थेचा ब्रह्माकुमारी संस्थेशी कोणताही संबंध नाही.
कुमारी बबिता उर्फ देवकी, बंधू द्वारिका व बंधू शाम यांना ते ब्रह्माकुमारी संस्थेविरुद्ध कार्य करतात म्हणून त्यांना संथेने काढून टाकलेले आहे. वर्तमान परिस्थिती ते सर्वजण ब्रह्माकुमारी संस्थेची लबाडीने कॉपी करून ब्रह्माकुमारी, ब्रह्माकुमारांची व जनतेची फसवणूक करून पैसे उकळतात. यासंदर्भात ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविदयालय या संस्थेने कुमारी बबिता उर्फ देवकी, बंधू द्वारिका व बंधू शाम यांनी ओम मंडळी शिवशक्ती अवतार सेवा संस्था, रायपुर, छत्तीसगड यांचे विरुद्ध छत्तीसगड येथे वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तसेच कुमारी बबिता उर्फ देवकी, बंधू द्वारिका व बंधू शाम यांच्या ओम मंडळी शिवशक्ती अवतार सेवा संस्था, रायपुर, छत्तीसगड या संस्थेच्या कोणत्याही तत्वाशी ब्रह्माकुमारी ही संस्था कोणत्याही प्रकारे सहमत नाही.
कुमारी बबिता उर्फ देवकी, बंधू द्वारिका व बंधू शाम यांनी ओम मंडळी शिवशक्ती अवतार सेवा संस्था, रायपुर, छत्तीसगड यांनी अगर त्याच्या अनुयायानी यापूर्वी, आता व यानंतर कोणत्याही बेकायदेशीर गोष्टी केल्या असतील, करत असतील व करतील तर त्यास ब्रह्माकुमारी ही संस्था कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. ब्रह्माकुमारी संस्थेच्या सर्व अनुयायांना व जनतेला या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, त्यांनी ओम मंडळी शिवशक्ती अवतार सेवा संस्था, रायपुर, छत्तीसगड यांचे पासून सावध रहावे.