निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सहकार क्षेत्रातील भिष्माचार्य ओळखले जाणारे प्रल्हाद पाटील तथा दादासाहेब कराड यांचे निफाड येथे वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
१९८० च्या कालखंडामध्ये शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उभारलेल्या शेतकरी आंदोलनाला बळ देण्याचे काम प्रल्हाद पाटील कराड यांनी केलेले होते. साखर कारखान्याचे खासगीकरण करण्याची मोहीम सुरू झाल्यानंतर गोदकादवा हा राज्यातील पहिला खासगी सहकारी साखर कारखाना देखील उभारण्याचे श्रेय प्रल्हाद पाटील कराड यांच्याकडे जाते.
त्यांचा अंत्यविधी सोमवार १७ रोजी सकाळी ९ वाजता जळगाव (निफाड) स्मशानभूमीत होणार आहे. त्यांच्या पश्चात ६ मुले, २ मुली, सूना नातवंडे असा परिवार आहे.