नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तालुक्यातील मंगळणे येथील आदिवासी बांधवांच्या हक्काच्या जमिनी परत मिळाव्यात, या करिता नांदगाव तहसील कार्यालयात, प्रहार जनशक्तीचे तालुका अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली, बेमुदत बिऱ्हाड आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आदिवासी बांधवांना जमिनी परत मिळाव्यात, कळमदरी येथील जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करावी व या शाळेचे मुख्याध्यापक यांना निलंबित करण्यात यावे,तसेच मंगळणे गावातील प्रकल्पग्रस्त आदिवासींना, पोही येथे शेतजमिनी मिळाल्या आहेत,त्या जमिनीवर कब्जा मिळावा या साठी वारंवार पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे. या वेळी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहे.