नाशिक – अनाधिकृत व अतिक्रमण असलेल्या मशिदींवर भोंग्यांना परवानगी देऊ नये असे निवेदन भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी नाशिक पोलिस आयुक्त यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रात व इतर राज्यातही धार्मिक स्थळावरील प्रार्थनेसाठी लावलेल्या भोंग्यांवरुन मतमतांतरे सूरु आहेत. अशा परिस्थितीत आपण एक आदेश पारित केला. त्यामध्ये परवानगी घेणेबाबतचा उल्लेख दिसून येतो. याविषयी आपणास सूचित करू इच्छितो की अनेक ठिकाणी अनेक धार्मिक स्थळे अनधिकृत जागेवर किंवा अतिक्रमित जागेवर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा धार्मिक स्थळाबाबत भोंग्याची परवानगी देताना त्या धार्मिक स्थळाची आजची स्थिती लक्षात घेऊन जागेचे पेपर्स, बांधकामाचा मंजूर नकाशा, तसेच महापालिकेचा पूर्णत्वाचा दाखला तत्सम इतर कागदपत्रे तपासूनच आपण नियमाप्रमाणे परवानगी द्याल अशी आशा व्यक्त करतो. सर्व धर्मियांसाठी नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो.