नाशिक – ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. नाशिक मधील जेष्ठ संगीत शिक्षक, तसेच वादक म्हणून त्यांची ख्याती होती. ज्या काळात महिलांनी गाणे म्हणणे किंवा शिकणे व्यर्ज होते. त्या काळात त्यांनी ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाची स्थापना करून अनेक महिलांना संगीत शिक्षण दिले संपूर्ण हरिपाठाला रागदारी तील वैविध्यपूर्ण रागांमध्ये संगीतबद्ध केले.
त्यांच्या निधनानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्रध्दांजली अर्पण केली असून त्यांनी सांगितले की, ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अतिशय महत्वपूर्ण असून त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे. मी व माझे कुटुंबीय दसककर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच पार्थना करतो.