इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशभरात आयपीएलचे म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग सामने सुरू असून त्याचबरोबर या खेळासाठी पैसा देखील लागत आहेत. परंतु आणखी एक विशेष बाब म्हणजे पैज लावण्याला उधाण आले आहे, असे म्हटले जाते. यामध्ये अनेक जण सहभागी होतात, यात सहभाग घेऊन एका पोस्टमास्तरने एक कोटी रुपये गमावले विशेष म्हणजे त्याचे हे स्वतःचे पैसे नसून पोस्टात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांची होते.
क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करताना मध्य प्रदेशातील या पोस्टमास्टरला एक कोटी रुपये गमवावे लागले. सट्टेबाजीसाठी त्याने दोन डझन कुटुंबांची एक कोटी रुपयांची बचत पणाला लावल्याचा आरोप आहे. कुटुंबांच्या मुदत ठेवीचे पैसे सागर जिल्ह्यातील सब पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायचे होते. बीना सब पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्टर विशाल अहिरवार यांना बीना गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी अटक केली.
पोलिसांसमोर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. या बाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी पोस्टमास्टरने बनावट एफडी खात्यांसाठी मूळ पासबुक जारी केले आणि मागील दोन वर्षांपासून संपूर्ण पैसा आयपीएल क्रिकेट बेटिंगमध्ये गुंतवला. अटक करण्यात आलेल्या सब पोस्टमास्टर विशाल अहिरवार आता फसवणूक आणि विश्वासाचे उल्लंघन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याआधी मध्य प्रदेशातच जबलपूरमध्ये कथित ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बहुगुणा यांनी दिली.