इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिमाचल प्रदेशातील लाहौल येथे लिखित पत्र दूरवरच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दररोज सुमारे ३२ किलोमीटर चालणारे पोस्टमन प्रेम लाल यांना पोस्ट विभागाचा प्रतिष्ठित मेघदूत पुरस्कार मिळाला आहे. लाहौलचा उदयपूर शालग्रन मेल लाइनचा भाग प्रेम लालच्या क्षेत्रात येतो. हा भाग राज्याच्या मंडी विभागात येत असून, जो ३२ किलोमीटर अंतराचा आहे.
मेघदूत पुरस्कार १९८४ साली सुरु करण्यात आला होता आणि हा राष्ट्रीय स्तरावरील पोस्ट विभागाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. ते आठ श्रेणींमध्ये दिले आहे. २१ हजार रुपये, पदक व प्रशस्तिपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पोस्टमन प्रेमलाल यांना प्रशस्तिपत्रक देण्यात आले आहे. प्रेमलाल ज्या भागात काम करता तो भाग वर्षभर बर्फाने झाकलेला असतो. हिवाळ्यातही या प्रदेशात हिमस्खलन होते. या जोखमीच्या आणि धोकादायक वाटेवर प्रेमलाल आपला प्रवास रोज अखंडपणे पूर्ण करतात. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून ९००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर आहे. अशा जोखमीच्या परिस्थितीतही ते आपले काम प्रामाणिकपणे आणि खंड न पडू देता पूर्ण करतात. त्यांना देण्यात आलेल्या प्रशस्तिपत्रकात याबाबतही उल्लेख करण्यात आला आहे.
‘या’ कर्मचाऱ्यांचाही सन्मान
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन कर्मयोगी या संकल्पनेनुसार पोस्ट खात्याने विकसित केलेल्या ‘डाक कर्मयोगी’ या ई-लर्निंग पोर्टलचा शुभारंभही केला. प्रेमलाल व्यतिरिक्त ज्या कर्मचाऱ्यांना यावेळी मेघदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यात पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस बांकी तुलसीपूर शाखेचे अशोक कुमार साहू, त्याबरोबरच, कर्नाटक सर्कलच्या कार्यालयात असलेले पोस्ट सहाय्यक धनंजय टी, आदींचा समावेश आहे. तसेच विजेंदर सिंग राणा, संदीप गुंडू काडगावकर, रणधीर कुमार, छल्ला सी नागेश आणि के कलैवानी यांनाही त्यांच्या कार्याप्रती सन्मानित करण्यात आले.
Postman Walks 32 kilometer for to give postcard