नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना सारख्या भीषण संसर्गामुळे कोविड ग्रस्त रुग्णांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. कोरोना बरा झाल्यानंतर देखील अनेक दिवसांच्या कालावधीनंतर श्वसनाच्या आजारांसह इतर आजारांमध्ये हाडांच्या दुखापती , हाडांचे आजार , हाडांची झीज इ. आजार आढळून येत आहे. आणि यातूनच खुब्यांच्या हाडांमधे अव्हस्क्युलर नेक्रोसिस सारखे आजार उद्भवत आहेत. अशातच ज्या लोकांना एक वर्षापूर्वी कोविड झाला होता अशांमध्ये खुब्याच्या आजारांचे प्रमाण वाढलेले दिसते आणि एमआरआय केल्यावर ते लक्षात येते. कोविड मधून बरे झाल्यांनतर हाडांची कमकुवता आणि खुबादुखीचे प्रमाण वाढत असून याचा शरीरावर आणि दैनंदिन हालचालींवर अपरिहार्य परिणाम होत आहे.
नाशिक येथील वोक्हार्ड हॉस्पिटलचे सिनियर आर्थोपेडिक सर्जन डॉ. पंकज गुंजाळ म्हणाले की बऱ्याचदा रुग्णांना पाठीच्या किंवा खुब्याच्या दुखापतीचे विश्लेषण करणे अवघड जाते. बऱ्याच पेशंटमध्ये मणक्याचा ही आजार असतो आणि त्यामुळेही खुब्याचे दुखणे होऊ शकते हे लक्षात येत नाही . मागील एका वर्षात सांधेदुखीच्या तक्रारी घेऊन २५ ते ३० या वयोगटातील तरुण रुग्ण अव्हस्क्युलर नेक्रोसिसने ग्रस्त आहेत . ह्या आजारामुळे खुब्यातील हाडांचा रक्त पुरवठा कमी होतो त्याने हाड निर्जीव होण्यास सुरुवात होते ह्यातून हाडांमध्ये सूज निर्माण होणे पाणी जमा होणे अशा गोष्टी घडतात ह्या परिस्थितीत रुग्णांच्या खुब्या मध्ये असह्य वेदना होतात.
अव्हस्क्युलर नेक्रोसिस होण्यामागे अनेकदा कारणे समजत नाहीत. अव्हस्क्युलर नेक्रोसिस चे सध्याचे वाढते प्रमाण बघता कोविड त्याचे कारण आहे का अशी शंका निर्माण होते. प्रमाणाबाहेर अनियमित अथवा सल्ल्याशिवाय घेतलेले स्टेरॉईड, दारू, सिगारेटचे अधिक प्रमाण, रक्ताचे विकार, सिकल सेल हि कारणे सुद्धा महत्वपूर्ण आहेत. अव्हस्क्युलर नेक्रोसिस हा चार टप्य्यातील आजार आहे. पहिल्या टप्प्यात रुग्णांना सौम्य स्वरूपात हाडांच्या वेदना होण्यास सुरुवात होते.
दुसऱ्या टप्प्यात रुग्णांचे प्रमाण अधिक आढळून येते . यात रुग्णाचे दुखणे वाढत जाऊन हाडांमध्ये फ्लुइड जमा होते त्यास एडिमा असे म्हणतात. यासाठी कोअर डिकम्प्रेशन द्वारे रुग्णाच्या हाडांमध्ये ड्रिल होल केले जाते आणि पोकळी निर्माण करून हाडांमधील पाणी काढले जाते आणि आतले प्रेशर कमी होते.ज्यामुळे चौथ्या टप्प्यापर्यंत जाण्याचा धोका तूर्तताः टाळण्यास मदत होते. तसेच रुग्णाच्या स्नायूंची ताकद वाढवत चौथ्या टप्प्यापर्यंत हा आजार जाण्यास विलंब होतो . जेव्हा रुग्णाचे आजाराकडे दुर्लक्ष होते अथवा त्याचे योग्य निदान होत नाही आजार वाढत जाते , आणि लवकरच तिसऱ्या आणि चौथ्या ( ३/ ४ stages ) टप्य्यात पोहचतो . अशा परिस्थितीत दुखणं कमी करण्यासाठी जॉईंट हिप रिप्लेसमेंट ( THR ) करावे लागते.
post covid disease patient suffer doctor consultation