मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी-जास्त होत असतानाच अनेक वाहन उद्योगांना देखील याचा फटका बसला आहे. विशेषत : लॉकडाऊन काळात वाहन उद्योग डबघाईस आल्याचे बोलले जात होते. परंतु आता गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात आणि या वर्षीच्या प्रारंभी वाहन उत्पादक कंपन्यामध्ये आशादायी वातावरण दिसत असून अनेक वाहन उत्पादक कंपन्या वेगवेगळे कार मॉडेल बाजारपेठेत आणत आहेत. विशेषतः भारतीय बाजारपेठेत आकर्षक आणि दणकट असलेल्या नानाविध कंपन्यांच्या कार मॉडेल विशेष मागणी दिसून येत आहे. सहाजिकच वाहन बाजारात सध्या तेजीचे वातावरण असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच प्रीमियम लक्झरी कार उत्पादक पोर्श कंपनीने आपल्या मिड-इंजिन स्पोर्ट्स कार श्रेणीतील दोन नवीन मॉडेल भारतात लॉन्च केले आहे.
किंमत
718 केमन जीटीएस 4.0 ची किंमत 1 कोटी 46 लाख 50 हजार 000 रुपये (एक्स-शोरूम) आणि 718 बॉक्सस्टर जीटीएस 4.0 ची किंमत 1 कोटी 49 लाख 78 हजार 000 रुपये (एक्स-शोरूम) अशी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोर्श 718 Cayman हे 2-दरवाज्यांचे कूप मॉडेल आहे तर Porsche 718 Boxter हे 2-दरवाजा कॅब्रिओलेटसह देण्यात येते.
बाह्य रुप
स्पोर्ट्स कारमधील नवीनतम बदलांमध्ये त्याच्या बाहेरील बाजूस एलईडी डीआरएलसह टिंटेड एलईडी हेडलॅम्प, GTS-स्पेशल फ्रंट ऍप्रॉन, 20-इंच सॅटिन ब्लॅक अलॉय व्हील, ब्लॅक एक्सटीरियर एअरब्लेड्स, मोठे एअर इनटेक आणि ब्लॅक फ्रंट स्पॉयलर यांचा समावेश आहे.
https://twitter.com/Porsche_India/status/1479029719936823297?s=20
इंजिन क्षमता
4.0-लिटर नैसर्गिकरित्या आकांक्षा असलेल्या सहा-सिलेंडर फ्लॅट इंजिनसह GTS 4.0 मॉडेलला 430 Nm पीक टॉर्कसह 395 bhp च्या टॉप पॉवरचा बॅकअप देण्यासाठी रेट केले आहे. तसेच इंजिन सात-स्पीड पीडीके ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. दोन्ही नवीन मॉडेल्स पोर्श स्टॅबिलिटी मॅनेजमेंट कंट्रोल, टॉर्क वेक्टरिंग, इलेक्ट्रोमेकॅनिकल पॉवर स्टीयरिंग, लॉन्च कंट्रोल आणि स्पोर्ट क्रोनो पॅकेज यासारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह येतात.
स्पोर्ट्स सस्पेंशन
या दोन्ही कारमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांयाशिवाय, नवीन Porsche 718 GTS ला Porsche Active Suspension Management स्पोर्ट्स सस्पेंशन देखील मिळते. ज्यात स्टिफर स्प्रिंग्स, स्टिफर अँटी-रोल बार आहेत. त्यामुळे कार चालकाला त्याचा निश्चितच फायदा होणार असून वाहनाला कोणत्याही खडतर रस्त्यावर त्याचा त्रास जाणवणार नाही
अन्य वैशिष्ट्ये
दोन्ही नवीन पोर्श मॉडेल्सना पोर्श कम्युनिकेशन मॅनेजमेंट (पीसीएम) सह 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले मिळतो. याशिवाय, यात 4.6-इंच रंगीत स्क्रीन, ऑटोमॅटिक एसी, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्ससह सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळतो.