नवी दिल्ली – पॉर्नहब हा शब्द ऐकताच तुमच्यासमोर एकच गोष्ट येते आणि ती म्हणजे पोर्नोग्राफी. परंतु गणिताचे शिक्षण देण्यासाठी पॉर्नहब प्लॅटफॉर्मचा वापर होऊ शकतो याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला होता का? पण तैवान येथील एका गणिताच्या शिक्षकाने ही किमया करून दाखविली आहे.
पॉर्नहबवर गणिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी कोणी का जाईल असा विचार तुमच्या डोक्यात आला असेल. परंतु या शिक्षकाच्या व्हिडिओला तब्बल दहा लाख व्ह्यूज मिळाले आहेत हे ऐकल्यावर तुम्ही निश्चितच तोंडात बोट घालणार आहात. संबंधित शिक्षक दरवर्षी जवळपास दोन कोटी रुपये कमावतात. प्लॅटफॉर्म कोणताही असला तरी नागरिकांना गणिताचे कौशल्य सुधारण्याची गरज भासत आहे हेच यातून दिसत आहे.
तैवान येथील चांगशू हे शिक्षक changshumath666 या हँडलवरून गणित शिकवतात. त्यांचे पॉर्नहबवर एक व्हेरिफाइड अकाउंट आहे. विशेष म्हणजे त्यांनी XVideos सह इतर पॉर्न साइट्सवर गणित शिकवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. इतर साइट्सवर वयस्कांनाच क्लिप पाहण्याची परवानगी असते. पॉर्नहबवर मात्र असा भेदभाव नाही. युजर्सचे गणिताचे ज्ञान वाढावे हाच उद्देश असल्याचे पॉर्नहबचे म्हणणे आहे.
खूपच कमी नागरिक वयस्क व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर गणित शिकवतात. व्हिडिओ पाहणार्या नागरिकांची संख्या जास्त आहे. अशा साइट्सवर व्हिडिओ अपलोड केले तर अनेक नागरिक ते पाहतील, असे चांगशू यांनी मेल पत्रिका या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. कठोर मेहनत करा, कठोर मेहनत करा, असा संदेश ते त्यांच्या अकाउंटवरून देत आहेत. नागरिकांना भलेही व्हिडिओ पाहण्यास रस नसेल. परंतु एक शिक्षक वयस्क प्लॅटफॉर्मवर कॅलकुलस शिकवतात हे त्यांना आवश्य ठाऊक आहे, असे चांगशू यांनी सांगितले.