मुंबई – अश्लील चित्रपट प्रकरणी राज कुंद्रावर कारवाई झाल्यानंतर आता हळूहळू इतर संशयितांवरही पोलिसांचा फास आवळला जात आहे. मुंबई पोलिसांनी उल्लू टीव्हीच्या सीईओविरुद्ध कारवाई केली आहे. चित्रपट निर्माती कंपनी उल्लू डिजिटल प्रा. लि. चे सीईओ विभू अग्रवालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीच्या देशातील प्रमुख अंजली रैना यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे.
उल्लू टीव्ही कंपनी अश्लील चित्रपट बनविण्यावरून नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यांच्या कार्यक्रमावर नेहमची प्रश्न उपस्थित होत आले आहेत. अॅडल्ट कंटेटमुळेच कंपनीबाबत चर्चा सुरू असते. अश्लील चित्रपट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राविरुद्ध मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली होती. राज कुंद्राला अटक करणे का गरजेचे आहे हेसुद्धा सरकारी वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केले आहे.