मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक पती राज कुंद्रा याचे नवनवे प्रताप दररोज पुढे येत आहेत. गुन्हे शाखेच्या तपासात कुंद्राच्या संदर्भातील अनेक अशा गोष्टी उघडकीस आल्या आहेत ज्यामुळे त्याच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. आता त्याच्या कार्यालयांमध्ये गुप्त तिजोरी आढळली असून त्यातील दस्तावेज तपासण्याचे काम सुरू झाले आहे.
पॉर्न फिल्म बनविणे आणि त्या अॅप्सवर अपलोड करण्याच्या आरोपात राज कुंद्रा गेल्या आठवडाभरापासून पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून त्यातून अनेक नवनवे खुलासे होत आहेत. आता राज कुंद्राच्या व्हियान आणि जे.एल. स्ट्रीम या अंधेरी येथील कार्यालयांमध्ये एक गुप्त तिजोरी सापडली आहे. याशिवाय कुंद्राचे एक व्हॉट्सएपचॅट सुद्धा पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात पॉर्न व्हिडीओज ९ कोटी रुपयांना विकण्याची डील जवळपास फायनल झालेली होती. या संपूर्ण प्रकरणाचे तार आंतरराष्ट्रीय स्तरावर जुळलेले आहेत, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अनेक वर्षांनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे मोठ्या पडद्यावर आगमन होत आहे. ‘हंगामा2’च्या निमित्ताने तिचा जलवा बघण्याची चाहत्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. अशात राज कुंद्रा प्रकरणामुळे तिचा हिरमोड झाला आहे. माझा पती निर्दोष असल्याचे ती ती सोशल मिडीयावर गेल्या काही दिवसांपासून वारंवार ओरडून सांगत आहे. मात्र कुंद्रा याच्यावरील गुन्हा जवळपास सिद्ध झाल्यासारखेच आहे. त्यामुळे शिल्पापुढे आहे ती परिस्थिती स्वीकारणे व पुढे जाणे, याशिवाय कुठलाही पर्याय नाही, असे चित्र सध्या तरी आहे.