इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकला आहे. अश्लील मजकूर तयार करून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी राज कुंद्रा, पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांच्यासह इतरांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
राज कुंद्रा काही काळापूर्वीच तुरुंगाबाहेर आला आहे. अश्लील व्हिडीओ बनवण्याप्रकरणात सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर होता. नेहमीप्रमाणेच एखादे प्रकरण काही काळ चर्चेत राहते आणि मग विसरले जाते, तसेच काहीसे या प्रकरणी देखील घडले. आता पुन्हा एकदा पॉर्नोग्राफी हा मुद्दा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी राज कुंद्रा विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आता यात वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांचाही समावेश करण्यात आला आहे. याच प्रकरणात राज कुंद्रा याला महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते.
आरोपपत्रानुसार, एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हे अश्लील चित्रीकरण करण्यात आल्याचा आरोप आहे. यात मीत झुनझुनवाला आणि कॅमेरामन राजू दुबे यांचाही समावेश आहे. या आरोपपत्रात प्राईम ओटीटीचे सुवाजीत चौधरी आणि राज कुंद्राचे कर्मचारी उमेश कामथ यांचीही नावे आहेत. लंडनमधील हॉटशॉट या कंपनीचे व्यवस्थापक म्हणून या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे ही कंपनी कुंद्राचे मेव्हणे प्रदीप बक्षी यांच्या मालकीच्या केनिन या कंपनीच्या अखत्यारीत येते.
गेल्या वर्षी राज कुंद्रा याला अटक झाली होती. जवळपास दोन महिने तुरुंगात काढल्यानंतर जामिनावर तो बाहेर आला. जामिन मिळून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज कुंद्रा याने सीबीआयला पत्र लिहीत आपल्याला या प्रकरणात अडकावल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे, राज कुंद्रा याला अटक केल्यानंतर त्याच्या ऑफिसमध्ये पोलिसांनी छापे टाकले होते. त्याच्या ऑफिसमधील लॅपटॉपमध्ये ६८ पॉर्न व्हिडीओज सापडले होते.
Porn Film Mumbai Cyber police Charge sheet Raj Kundra
Crime Sherlyn Chopra Poonam Pande