शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटना करते तरी काय? तिच्यावर कारवाई का झाली?

सप्टेंबर 23, 2022 | 6:26 pm
in राष्ट्रीय
0
Popular Front of India PFI

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेच्या तब्बल ११ राज्यांमधील कार्यालयांवर छापे टाकले. संघटनेच्या १००हून अधिक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. ही संस्था नेमकी काय काम करते, तिच्यावर कारवाई का करण्यात आली, असे प्रश्न सध्या अनेकांना पडले आहेत. यासंदर्भात तपास यंत्रणेसह सूत्रांनी जी माहिती दिली आहे ती जाणून घेणे आवश्यक आहे.

पीएफआय संघटनेवर प्रमुख आरोप आहे तो दहशतवादी कारवाया केल्याचा. यावर्षी कर्नाटकातील हिजाब वादानंतर दोन संघटना चर्चेत आल्या. त्या म्हणजे कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सीएफआय) आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय). पीएफआयवर कर्नाटक पाठोपाठ उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अनेक राज्यांमध्ये बंदी घालण्याची मागणी झाली आहे.

गुप्तचर विभागाच्या अहवालात म्हटले आहे की, पीएफआय संघटना मुळातच हिंसक प्रवृत्तीची आहे. दोन वर्षापूर्वी केंद्र सरकारने या संघटनेच्या हालचालींवर राष्ट्रीय तपास यंत्रणेसह राज्यांतील दहशतवाद विरोधी पथकाला नजर ठेवण्यास सांगितले होते. केरळात ही संघटना खून, खुनाचा प्रयत्न, बॉम्बस्फोट आदी हिंसक घटनांमध्ये सक्रिय होती. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात दिल्ली आणि देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने होत असताना, त्यामागे पीएफआयचा हात असल्याचे म्हटले जात होते. तेव्हा उत्तर प्रदेशामध्ये पोलिसांनी पीएफआयच्या अनेक सदस्यांना अटक केली होती.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची स्थापना केरळात २००६ मध्ये झाली. १९९२मध्ये बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर ज्या काही मुस्लिम संघटना स्थापन झाल्या होत्या, त्यापैकी नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट ऑफ केरळ, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि मनिथा नीथी पसराय ऑफ तमिळनाडू या तीन संघटनांच्या विलिनीकरणातून ही संघटना स्थापन झाली आहे. याचे संपूर्ण नियंत्रण केरळमधून होते. असे असले तरी त्यांचे नेटवर्क संपूर्ण देशभरात आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही एक कट्टर इस्लामिक संघटना असून मागास आणि अल्पसंख्यांकाच्या अधिकारासाठी काम करणारी संस्था अशी स्वत:ची ओळख ते सांगतात. पण प्रत्यक्षात देशात झालेल्या अनेक दंगलीच्या मागे या संघटनेचे कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.

या संघटनेची केरळची शाखा ही जागतिक दहशतवादी संघटना असलेल्या आयएसआयसाठी काम करते. केरळमधील या संघटनेचे सदस्य सिरिया आणि इराकमधील आयएसआय मध्ये सामील झाले होते. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात पीएफआय आणि त्याची विद्यार्थी शाखा कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सीएफआय) च्या पाच सदस्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. पीएफआयचे राष्ट्रीय सरचिटणीस रौफ हे आखाती देशांमध्ये व्यावसायिक सौद्यांच्या नावाखाली पीएफआयसाठी निधी गोळा करत असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. त्यानंतर हे पैसे वेगवेगळ्या माध्यमातून पीएफआय आणि सीएफआयशी संबंधित तरूणांपर्यंत पोहोचवले गेले. सुमारे दिड कोटी रुपये गुन्हेगारी मार्गाने मिळाले. यातील काही भाग भारतातील पीएफआय आणि सीएफआयच्या बेकायदेशीर कारवाया करण्यात खर्च करण्यात आला. तसेच या पैशाचा वापर सीएए विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये तसेच २०२० मधील दिल्ली दंगलींमध्येही उघड झाला होता.

महत्त्वाचे म्हणजे या संघटनेने कधीही निवडणूक लढवली नाही. तसेच या संस्थेच्या सदस्यांच्या नोंदीही ठेवल्या जात नाहीत. यामुळे या संघटनेचे नाव कोणत्याही गुन्ह्यात आले तरी कायदेशीर यंत्रणांना या संघटनेवर कारवाई करणे कठीण जाते. २१ जून २००९ रोजी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) नावाची राजकीय संघटना स्थापन करण्यात आली. सध्या ही संस्था पीएफआयशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. पीएफआयचा हेतु अतिशय धोकादायक आहे. सामाजिक कार्य करण्याच्या नावाखाली परदेशातून निधी गोळा करणे आणि दहशतवादी मॉड्यूल तयार करणे, भारताविरुद्ध प्रचार करणे, शाळा-कॉलेजमधून नव्या तरुणांची भरती करणे, मुलांचे ब्रेनवॉश करणे, तरुणांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देणे, दगड फेकण्याचे प्रशिक्षण देणे, शांततेत सुरु असलेल्या मोर्चाला हिंसक करणे, देशात दंगल घडवणे, राजकीय हत्या आणि लव जिहाद प्रकरणी या संघटनेचे नाव समोर आले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून पहिल्यांदाच ही कारवाई झालेली नाही. २०११नंतर ही संघटना अधिक सक्रिय झाली. २०१३मध्ये केरळ पोलिसांच्या मदतीने राष्ट्रीय तपास यंत्रणेने कन्नूर (केरळ) येथे प्रशिक्षण केंद्र नेस्तनाबूत केले होते. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या सदस्यांना बॉम्ब तयार करणे, तलवारींचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे उघड झाल्याचा दावा त्यावेळी राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला होता.
सन २०१४मध्ये पहिल्यांदा केरळ शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून या संघटनेचा दहशतवादी हेतू उघड केला होता. २०१६मध्ये केरळात राष्ट्रीय तपास यंत्रणेने कारवाई करून इस्लामिक स्टेट म्हणजे आयएसचे मोड्युल उद्ध्वस्त केले होते. मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्यही हस्तगत केले होते. अटक केलेल्या या तरुणांचा ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंध असल्याचे स्पष्ट झाले होते.

जनतेसमोर देखाव्यासाठी मुस्लिम, आदिवासी आणि दलितांच्या अधिकारासाठी या संघटनेची स्थापना झाली होती. पण प्रत्यक्षात त्यांचे काम यापेक्षा वेगळे होते. एक कट्टर इस्लामिक संघटना म्हणून तिचे नाव देशात झालेल्या अनेक दंगलीत समोर आले. संशयास्पद हलचालींमुळे यावर अनेकदा बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. या संघटनेकडून इस्लाम धर्माचे रक्षण करण्याच्या नावावर तरुणांना सामील होण्यास सांगून त्यांना देशविघातक कारवाया करायला भाग पाडले होते. याबाबत गुप्तचर विभाग, राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच राज्यांतील दहशतवाद विरोधी विभाग यांच्याकडून पाळत ठेवली जात होती. देशविघातक कारवाया केल्या जात असल्याची खात्री पटल्यावर ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या शंभरहून अधिक सदस्यांकडे आक्षेपार्ह साहित्य आढळल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

सिमीप्रमाणेच या संघटनेचे काम सुरू होते. अशी माहिती या कारवाईत सहभागी झालेल्या एका अधिकाऱ्याने दिली. राज्याच्या दहशतवादविरोधी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातही या संघटनेने आपली पाळेमुळे रुजवायला सुरुवात केली होती. आता झालेल्या कारवाईत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, मालेगाव, जळगाव येथे या संघटनेने जाळे निर्माण सुरुवात केली होती. गुप्तचर विभागाने याबाबत वेळोवेळी माहिती पुरविली होती. मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या धडक कारवाईनंतर राज्याचा दहशतवादविरोधी विभागही सतर्क झाले आहे.

Popular Front of India PFI Role Duties NIA Action
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या  दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्रीसप्तशृंगी मातेच्या पूजा विधीमध्ये मोठा बदल; ट्रस्टचा निर्णय

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर मुलगा बसल्याने वादंग; विरोधकांची जोरदार टीका, डॉ. श्रीकांत शिंदेंनी दिले हे स्पष्टीकरण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
FdUWZ8FUAAA9p23

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर मुलगा बसल्याने वादंग; विरोधकांची जोरदार टीका, डॉ. श्रीकांत शिंदेंनी दिले हे स्पष्टीकरण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011