मुंबई – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे असलेल्या समंथा आणि नागा चैतन्य अखेर एकमेकांपासून विभक्त होणार आहे. तशी माहिती खुद्द नागा चैतन्य यानेच दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या वार्ता पसरत होत्या. दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांचा नागा हा पुत्र आहे. नागा याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी आणि सॅम आम्ही आता वेगवेगळ्या मार्गाने जाणार आहोत. तसा निर्णय आम्ही घेतलाय. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही आमची घट्ट मैत्री निभावली. यापुढील कठीण काळात हितचिंतकांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन त्याने केले आहे. दरम्यान, दोघांचे यापूर्वी अनेकदा समुपदेशन करण्यात आल्याचे सागितले जात आहे. मात्र, ते निष्फळ ठरले आहे. समंथा अक्किनेनी हिला घटस्फोटानंतर तब्बल ५० कोटी रुपये मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तसे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. नागा आणि समंथा यांनी २०१७ मध्ये लग्न केले होते. दरम्यान, घटस्फोटामागे काही कारणे असल्याचे सांगितले जाते. एका वृत्तानुसार समंथा ही चित्रपटांमध्ये बोल्ड सीन करीत आहे. नागार्जुनसह तिच्या सासरकडच्यांना ही बाब पसंत नाही. काही जणांचे म्हणणे आहे की, समंथा ही खुपच करिअरला महत्त्व देत होती. त्यामुळे तिचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. काहींनी म्हटले आहे की, समंथा ही अपत्य प्राप्तीबाबत विचार करत नव्हती कारण तिला करिअरमधून ब्रेक घ्यावा लागणार होता. नागा चैतन्यने शेअर केलेली पोस्ट अशी
— chaitanya akkineni (@chay_akkineni) October 2, 2021