नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले – श्रींगी यांची बदली झाली असून त्यांची मीरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालयातील उपायुक्त पदावर नियुक्ती झाली आहे. चौगुले यांची बदली झाल्याने आयुक्तालयातील मुख्यालय उपायुक्तपद रिक्त झाले असून येथे कोणाचीही वर्णी लागलेली नाही. त्यांच्या जागेवरील पदस्थापनेबाबत मात्र अद्याप आदेश निर्गमित झालेले नाहीत. गृह विभागाने गेल्या नोव्हेंबर महिन्यात काही उपायुक्त दर्जाच्या अधिका-यांची पदोन्नती व बदल्या केल्या होत्या. त्यात उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्या बदलीचे आदेश निर्गमित झाले नव्हते. मात्र, फेब्रुवारी अखेरीस पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असणा-यांसह इतर काही अधिका-यांच्या बदल्या गृह विभागाने केल्या आहेत. त्यात चौगुले यांचा समावेश आहे. लवकरच नव्या उपायुक्तांच्या पदस्थापनेबाबत आदेशाची शक्यता आहे. गेल्या बदली आदेशात आयुक्तालयातील चारपैकी तीन उपायुक्तांची बदली झाली होती. चौगुले यांचे पती निलेश श्रींगी हे उपमुख्यमंत्री कार्यालयात सनदी अधिकारी आहेत.