मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय वेटलिफ्टिंग संघटना व भारतीय क्रीडा प्राधिकरण आयोजित मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षण शिबिरासाठी जय भवानी व्यायामशाळेची खेळाडू पूजा राजेश परदेशी हिची निवड करण्यात आली असून २० दिवसांचे प्रशिक्षण घेण्यासाठी मलेशिया येथे रवाना झाली आहे. भारतातील गुणी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण शिबिराचा अनुभव मिळावा व त्यांच्या कामगिरीत जास्तीत जास्त सुधारणा व्हावी नवीन क्रीडा कौशल्ये आत्मसात करावी या दृष्टीने या सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या विविध भागातील २० खेळाडूंची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. पूजा सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरण पतियाळा येथे वेटलिफ्टिंगचा सराव करत आहे.
छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे पुजाला मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे डॉ. विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी. जी. धारवाडकर, अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर. एन. थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका सौ. पोतदार एस एस, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर, सचिव प्रमोद चोळकर, भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.