इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे ओबीसी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अखेर रद्द करण्यात आले. नाशिकच्या विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी हा मोठा निर्णय दिला. या प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपये असते. खेडकर यांनी ती सहा लाख रुपये दाखविली होती. प्रत्यक्षात त्यांच्या वडिलांची मालमत्ता आणि उत्पन्न किती तरी अधिक असल्याचे आढळून आल्यामुळे हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले.
याअगोदर केंद्र सरकारने मोठी कारवाई करत पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ केले होते. बोगस प्रमाणापत्र जमा करुन आयएएस झाल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होते. खेडकरने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रे खोटी आल्याचे समोर आल्यानंतर ही थेट कारवाई केंद्राने केली आहे. या प्रकरणी न्यायालयात खटलाही सुरु आहे.