नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने मोठी कारवाई करत पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ केले. बोगस प्रमाणापत्र जमा करुन आयएएस झाल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. खेडकरने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रे खोटी आल्याचे समोर आल्यानंतर ही थेट कारवाई केंद्राने केली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरु आहे.
गेल्या आठवड्यातच यूपीएसीने पूजा खेडकरची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी काही तांत्रिक अडचण आली होती. आता मात्र तिला पदमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र सरकारने पूजा मनोरमा दिलीप खेडकर, IAS प्रोबेशनर (MH:2023) यांना IAS ( प्रोबेशन) नियम, 1954 च्या नियम 12 अन्वये भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) तत्काळ प्रभावाने कार्यमुक्त केले.