बारामती – राजकारणात आम्ही २५ ते ३० वर्षापूर्वी इनक्युबेशन सेंटर उघडले होते. इनक्युबेशन सेंटर म्हणजे उबवणी केंद्र. दुर्देवाने आम्ही २५-३० वर्षात काय अंडी उबवली हे आपण सर्व जण पाहतो आहोत. आम्ही नको ती अंडी उबवली, असा जोरदार टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता लगावला आहे. येथील कृषी महानिद्यालयातील इनक्युबेशन सेंटरच्या उदघाटन समारंभात ठाकरे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ठाकरे यांनी यावेळी भाजपचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. राजकारणामध्ये एकमेकांचे पटत नाही, हे बरोबर आहे. पण, एकमेकांचे पटत नाही म्हणून अडथळे आणणे ही काही योग्य राजकारण असू शकत नाही. तशी ती आपली संस्कृतीही नाही. विकास झाला पाहिजे हे फक्त म्हणायचे. प्रत्यक्षात विकासात विघ्न आणायचे. आपल्याकडच्या विघ्नसंतोषींना नक्की काय मिळतं, असा सवाल ठाकरे यांनी भाजप नेत्यांना केला. यावेळी ठाकरे यांनी बारामतीतील विकासकामांचे खुप कौतुक केले. मी बारामतीला पुन्हा सहकुटुंब येईल, असेही ते म्हणाले. बघा या कार्यक्रमाचा व्हिडिओ
Inauguration of Incubation & Innovation Center | Baramati – LIVE https://t.co/tsUYHeGdW7
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 2, 2021