मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची निर्मिती सुरू आहे. या निमित्त लवकरच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी बाळासाहेबांची भाषणे ध्वनिमुद्रित केली आहेत, ती या स्मारकात वापरली जाणार आहेत. या ध्वनिफित राज यांच्याकडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भेट घ्यावी लागणार आहे.
बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत. बाळासाहेबांची शिवाजी पार्कवर दसऱ्याला जी भाषणे झाली त्यातील काही भाषणांच्या ध्वनिफिती उद्धव यांच्याकडे उपलब्ध नाहीत. ज्या ध्वनिफिती त्यांच्याकडे नाहीत त्यांपैकी बहुतेक सर्व या राज ठाकरे यांच्याकडे असू शकतात. कारण, राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी त्याकाळी बाळासाहेबांची भाषणे ध्वनिमुद्रित केलेली होती. राज यांच्याकडील या ध्वनिफिती मिळवायच्या तर त्यांच्याशी उद्धव यांना चर्चा करावी लागणार आहे. त्यावेळी दोघांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या मुद्दयावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. यासंदर्भात मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले,‘ते दोघे भाऊ आहेत. दोन भाऊ एकमेकांना कधीही भेटू शकतात, चर्चा करू शकतात. यामध्ये तिसऱ्या माणसाला पडण्याची गरज नाही. मी दोघांनाही ओळखतो, दोघांशीही माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पण राजकीय विषय येतो, तेव्हा मी मनापासून माझे पूर्ण कुटूंब आणि सहकारी कायम बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत.’
एनडीएचा सर्वांत मोठा पराभव महाराष्ट्रातच
संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. त्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय. २०२४ च्या निवडणुकीत समोरे जाताना आत्मविश्वास राहिलेला नाही. त्यामुळे हा पक्ष तोडा, तो पक्ष तोडा आणि मग एनडीएचे शेपूट जोडा. ते महाराष्ट्र सदनात येणार असतील. पण, एनडीएचा सर्वांत मोठा पराभव महाराष्ट्रातच होणार. इतिहासातील सर्वांत मोठा पराभव कुठे होणार असेल तर बिहार, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ, तेलंगणा या प्रमुख एनडीएचा पराभव होईल. त्यांनी महाराष्ट्र सदनात जास्तीत जास्त बैठका घ्यायला हव्यात, असे संजय राऊत म्हणाले.
Politics Uddhav Thackeray Raj Thackeray Meet
Mumbai MNS UBT Shivsena Brothers