रत्नागिरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बारसू येथे भेट दिली. त्यांच्या या दौऱ्यावरुन गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. ते याठिकाणी जाहीर सभा घेणार होते. मात्र, या सभेला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे ठाकरे यांनी याठिकाणी येऊन आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
बारसू येथे प्रस्तावित रिफायनरीसाठी सध्या सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी यास विरोध केला आहे. त्यानंतर राज्यातील राजकारण पेटले आहे. अशा वातावरणातच ठाकरे यांनी येथे भेट देण्याचे जाहीर केले होते. अखेर त्यांचा आज दौरा झाला आहे. याठिकाणी आंदोलकांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे.
बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र गैरसमजातून लिहिलं होतं. ती अंतिम भूमिका नव्हती असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केला. तेल शुद्धीकरण प्रस्तावित असलेल्या सोलगावला त्यांनी भेट दिली. तसंच बारसू इथल्या कातळशिल्पांची पाहणी केली. त्यानंतर ते वार्ताहरांना संबोधित करत होते. स्थानिकांच्या सहमतीशिवाय हा प्रकल्प होऊ नये. सरकारनं प्रकल्पासाठी स्थानिकांशी चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं.
बघा, त्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1654777231544123394?s=20
Politics Uddhav Thackeray Barsu Visit Press Conference