मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पक्ष फोडाफोडाची वारे सुरू आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांच्या नेतृत्वात सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज झाले आहेत. नाराजांपैकी काही आमदार ठाकरे यांच्या गटात येण्याची चर्चा सुरू आहे. त्या सर्व चर्चांना आता उद्धव ठाकरे यांनीच पूर्णविराम दिला आहे. शिंदे गटातून होणाऱ्या इनकमिंग चर्चा अफवा असल्याचे सांगत त्यांनी स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटातील आमदार संपर्कात असल्याचे विधान केले. त्यांच्या या विधानाने नवीन चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे शिंदे गट नाराज असतानाच या चर्चेमुळे आमदारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने सर्वच आमदारांमध्ये नाराजी होती. त्यानंतर विस्तार झाला पण त्यात राष्ट्रवादीच्या आमदारांना संधी मिळाली. वर्षभर प्रतीक्षा करूनही शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपद न मिळाल्याने आमदारांमध्ये असंतोष आहे. अशात अरविंद सावंत यांचे वक्तव्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
शिवसेनेत बंड होऊन एक वर्ष पूर्ण झालं, शिंदे फडणवीस सरकारमध्ये आता राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, यामु शिंदे गटातील नेत्यांना मंत्रिपद कधी मिळणार अशा चर्चा सुरू आहेत. सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, यातील काही आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे, दरम्यान, या चर्चेवर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, शिंदे गटातील आमदार नाराज आहेत की नाहीत याच्याशी माझा काही संबंध नाही. अजुनही या चर्चेत काही तथ्य नाही. ही फक्त चर्चाच आहे. गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना नेते अरि सावंत यांनी शिंदे गटातील नेते संपर्कात असल्याचे सांगितले होते, या चर्चांवर आज उद्धव ठाकरेंनी पूर्णविराम दिला.
शिंदेंच्या नाकीनाऊ
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या नव्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यामुळे आता हे मंत्रि शिंदेंच्या नाकीनऊ आले आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
देशाचे राजकारण आयपीएलसारखे
माझ्या आजारपणाची काही दिवसापासून चेष्टा करत आहेत. ते चालतं, ही कोणती संस्कृती आहे. २०१४ साली असे काय घडले की तुम्ही युती तोडली. तुम्ही म्हणाल तो देव, तुम्ही म्हणाल तो डाकू मग तुम्ही आहात कोण, असेही ठाकरे म्हणाले. सध्या कोणता खेळाडू कोणत्या पक्षात आहे तेच कळत नाही. देशाच राजकारण आयपीएलसारख झाले आहे, असेदेखील ठाकरे म्हणाले.