रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींना सौंदर्य पाहून खासदारकी दिली… संजय शिरसाटांचा आरोप…

by India Darpan
जुलै 31, 2023 | 2:25 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
1500x500 e1690793657928

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे व उद्धव ठाकरे गटातील शाब्दीक चकमक काही संपलेली नाही. उलट ती सातत्याने वाढतानाच दिसते. कुणीतरी नेता दुसऱ्याला डिवचतो आणि त्यानंतर महाभारत सुरू होते. आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या महिला नेत्याला डिवचले आणि त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडालेली आहे.

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी प्रियंका चतुर्वेदी यांना खासदारकीवरून डिवचले होते. त्याला आता प्रियंका चतुर्वेदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ज्यांनी ५० खोक्यांसाठी आपला आत्मा विकला त्यांनी मला गोष्टी सांगण्याची गरज नाही, या शब्दांत प्रियंका चतुर्वेदी यांना शिरसाट यांना सुनावले आहे. आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून चतुर्वेदींना उमेदवारी दिली, असे वक्तव्य आमदार संजय शिरसाट यांनी केले होते.

यावर ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, ‘मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे, हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही. ज्याने ५० खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला, त्याने तर बोलण्याची गरजच नाही.’ संजय शिरसाट यांनी त्यापूर्वी चतुर्वेदींवर विधान केले होते. ज्यांना सौंदर्य बघून राज्यसभेची उमेदवारी मिळाली, त्या आधी काँग्रेसमध्ये होत्या आणि आता आम्हाला निष्ठेचे धडे देत आहेत, अशी टीका त्यांनी केली होती.

कोण आहेत चतुर्वेदी?
संजय शिरसाट म्हणाले होते, ‘काल उद्धव ठाकरे यांची उत्तर भारतीयांची सभा झाली. या सभेत प्रियांका चतुर्वेदी या शिवसेनेवर भाषण करत होत्या. गद्दारांचे काहीतरी केले पाहिजे, असे वाक्य त्यांच्या भाषणात होते. चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्याबद्दल ‘कोण आहेत चतुर्वेदी?’ असे म्हटले होते ते खरेच आहे.’

मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला.

संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून…

— Priyanka Chaturvedi?? (@priyankac19) July 30, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्यात दहशतवाद्यांकडे सापडल्या अनेक धक्कादायक बाबी… एटीएसचा कसून तपास

Next Post

‘तारक मेहता’ शोला १५ वर्षे पूर्ण… निर्माते मोदींनी केली ही मोठी घोषणा

India Darpan

Next Post
Asit Kumar modi tmkoc e1687240520941

'तारक मेहता' शोला १५ वर्षे पूर्ण... निर्माते मोदींनी केली ही मोठी घोषणा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011