ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या नऊ महिन्यांपासून शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये जोरदार वाद पेटला आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे याप्रश्नी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे यांना गंभीर दुखापत झाली असून त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणाची शिवसेना (उबाठा गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. रोशनी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासह ठाण्याला जाऊन रोशनी शिंदे यांची ते भेट घेणार आहेत.
https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1643233811814285312?s=20
शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकाला भिडल्याने ठाण्यामध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. त्यातच ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. तेथेच हा प्रकार झाला आहे. आणि याप्रकरणी पोलिसांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याने ठाकरे गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा दावा खासदार राजन विचारे यांनी केला होता. गुन्हा दाखल व्हावा यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिस ठाण्याच्या बाहेर जमा झाले होते. ठाणे शहर व जिल्हा हा शिंदे घटना मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या हाणामारी व गोंधळानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दखल घेतली असून शिंदे यांनी आनंदाश्रमामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत दोन तास बैठक घेतली. फेसबुकवरील पोस्टवरुन ठाकरे आणि शिंदे गटात वाद झाला आणि त्यातून मारहाणीचा प्रकार घडला, असे सांगण्यात येते.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. बघा, त्यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1643178426809868290?s=20
Politics Thane Thackeray Group Women Beaten Police FIR