मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेतील आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. कायंदे या ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्याही होत्या. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर कायंदे या शिंदे गटात दाखल झाल्या आहेत. शिंदे यांनीही एक चाल पुढे खेळत कायंदे यांना शिंदे गटाचे प्रवक्तेपद आणि सचिव पदही बहाल केले आहे. शिवसेनेत पहिल्यांदाच एका महिलेची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आता या वादामध्ये एक पत्र समोर आले आहे. कायंदे या शिंदे गटात का गेल्या याचा खुलासा करणारे हे पत्र आहे. ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी हे पत्र उघडकीस आले आहे.
अंधारे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन सुरू होते त्यावेळी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले होते. हे पत्र मनीषा कायंदे यांच्यासंदर्भात होते. कायंदे यांच्याकडून गुंडांच्या टोळीचा वापर होत आहे अशा संदर्भातील हे पत्र होते. तसेच, ४० कोटी रुपयांच्या व्यवहाराचाही त्यात उल्लेख आहे. शिंदे गटाने कायंदे यांना या पत्राचीच धमकी दिल्याने अखेर त्यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे अंधारे यांनी स्पष्ट केले आहे.
अंधारे यांनी सादर केलेले पत्र खालीलप्रमाणे