नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह याचा आज फैसला होणार आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट हे दोन्ही आमने सामने आहेत. गेल्या जून महिन्यात राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व सत्तासंघर्ष गाजला. राज्यात सत्तांतर झाले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे.
ठाकरे आणि शिंदे गटातील वाद आणि याद्वारे निर्माण झालेला प्रश्न सोडविण्यासाठी हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या घटनात्मकपीठाकडे जाणार की नाही याचा फैसला आज होणार आहे. तसेच, जर ही सुनावणी ५ न्यायमूर्तींच्याच घटनापीठाकडे राहिली तर आजपासून सलग सुनावणी होणार का, याची मोठी उत्सुकता सर्वांना आहे. आज सुनावणीत काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/_prashantkadam/status/1625356367614849024?s=20&t=3-kYF-dzWMwLE7m_ZAXI6A
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील दोन्ही गटांनी त्यांच्या वकीलांमार्फत लेखी प्रतिज्ञापत्र यापूर्वीच न्यायालयापुढे सादर केले आहेत. त्यात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी भक्कम दावे केले आहेत. शिंदे गटाने लेखी कागदपत्रांद्वारे दावा केली आहे की, तब्बल ४० शिवसेना नेते, ६ उपनेते, १३ खासदार, ४० आमदार, ४९ जिल्हा प्रमुख, ८७ विभाग प्रमुख आणि एकूण प्रतिनिधी सभेतले २८२ पैकी १९९ जणांचा आपल्याला पाठिंबा आबे. यासंदर्भात त्यांनी जे कागदपत्र सादर केले आहे त्यात हे सर्व नमूद केले आहे.
युक्तीवादात ठाकरे गटाने म्हटले आहे की, दहाव्या शेड्युल नुसार या लोकांनी पक्ष सोडला, त्यामुळे ते पक्षाच्या चिन्हावर दावा करु शकत नाहीत. तसा अधिकार त्यांना मिळत नाही. तर, शिंदे गटाने दावा केला आहे की, संघटनात्मक पक्षाचा ठाकरे गटाचा दावाच अयोग्य आहे. कारण, त्यांची निवड ही लोकशाहीला धरुन नाही. त्यामुळे शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख या पदालाच आव्हान दिले आहे.
दरम्यान, आता न्यायालय काय निर्णय देते याकडे राजकीय क्षेत्रासह सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Politics Shivsena Supreme Court Thackeray Shinde Verdict
Maharashtra Political Crisis