नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाला काल बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर आज या गटाने निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हांचा पर्याय ई – मेलव्दारे सादर केले आहे. यात तळपता सूर्य ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड या चिन्हांचा समावेश आहे. या तीन्हीपैकी तळपता सूर्य हे शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी ठाकरे गटाला शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाबरोबरच मशाल हे चिन्ह दिले. पण, शिंदे गटाला नाव दे शिंदे गटाने चिन्हासाठी दिलेले तिन्ही पर्याय फेटाळून लावले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने आज सकाळपर्यंत नवीन चिन्हाचा पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही नवीन चिन्हांची यादी पाठवण्यात आली आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1579806357875630080?s=20&t=liyk6Gjnonrx7LR6NSOnBw
केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर सोमवारी मोठा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेना पक्षामध्ये मोठी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी आयोगाने गोठविली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाला नवे नाव आणि चिन्ह दिले तर शिंदे गटाला नाव दिले. पण, चिन्हाचा प्रश्नावर आज निर्णय होणार आहे.
ठाकरे गट
नाव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
चिन्ह – मशाल
शिंदे गट
नाव – बाळासाहेबांची शिवसेना
चिन्ह – अद्याप निर्णय नाही
Politics Shivsena Shinde Group Symbol Election Commission