मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचा वर्धापन दिन शिंदे गट आणि ठाकरे गटाकडूनही साजरा केला जात आहे. त्यामुळे मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात दोन्ही गटाकडून वर्धापन दिन साजरा करण्यासाठी जणू काही स्पर्धा लागली आहे. ठिकठिकाणी भगवे झेंडे फडकताना दिसत आहेत, त्यातच उद्धव ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून शिशिर शिंदे यांच्या नंतर आता प्रा. मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची सचिव पदावर नियुक्ती आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राकायंदी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनोगत व्यक्त करताना मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली. गेल्या वर्षभरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात होत असलेला बदल आणि त्यांच्या कामाची गती पाहूनच आपण एकनाथ शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेत प्रवेश केला. केवळ दोषारोप करणे आणि अनेक जण पक्ष सोडून का जात आहेत, याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे, अशी अनेक कारणे दिली आहेत, यापुढेही अनेक जण इकडे येतील, कारण त्यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. भविष्यातही ठाकरे गटातून शिंदे गटात महिलांचे प्रवेश होतील, असे प्रा. कायंदे यांनी म्हटले आहे.
वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रा.मनिषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. कायंदे यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी प्रा. कांयदे यांच्याकडे व्यक्त केली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान, मुंबईतील चुनाभट्टी भागातील माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल, त्यांची पत्नी सान्वी विजय तांडेल यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी प्रा. मनिषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी मनिषा कांयदे यांच्याकडे व्यक्त केली.
दरम्यान, मुंबईतील चुनाभट्टी भागातील माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल, त्यांची पत्नी सान्वी विजय तांडेल यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. तसेच त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह चुनाभट्टी भागातील अनेक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.