अलिबाग (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नेहमीच मंत्रिपदाच्या चर्चेत असलेले शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी एका जाहीर कार्यक्रमात मंत्रीपदापासून दूर का राहिलो यांची थेट मजेशीर कारणेच सांगितली. ते म्हणाले की, एका आमदाराने पत्नी आत्महत्या करेल सांगितले, दुसऱ्याने राजीनाम्याची धमकी दिली तर तिसऱ्याने नारायण राणे संपवतील असे म्हणत तीन आमदारांनी मुख्यमंत्र्यांना मंत्रीपदासाठी गळ घातली. म्हणून पेचात पडलेल्या मुख्यमंत्र्यांना या आमदारांना मंत्रीपद द्यावे असे सांगून आपण मंत्रीपदापासून दूर राहिलो.
अलिबागमधील खानावचे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळींनी बुधवारी आमदार गोगावले, आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. याच कार्यक्रमात जाहीर भाषणात त्यांनी पहिल्यांदा मंत्रीपद का मिळाले नाही याची कारणे सांगितली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री झाले नाहीत. आमच्यासारखे ४० आणि इतर ६ शिलेदार ताठ मानेने आम्ही त्यांच्यामागे उभे राहिलो म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासारखा चांगला माणूस मुख्यमंत्री होऊ शकले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यापद्धतीने मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे आमच्या जिवावर मुख्यमंत्री झाले आहेत असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून भरत गोगावले यांची ओळख आहे. पहिल्याच मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळेल असे बोलले जात होते. पण, १४ महिने झाल्यानंतर सुध्दा त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. अजित पवार यांनी सत्तेत सहभाग घेतल्यानंतर ते आता पुन्हा वेटिंगवर आहे. आता पुढील मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळेल असे बोलले जात आहे. पण, जर मिळाली नाहीच तर भरत गोगावले पुन्हा असे किस्से सांगेल त्यावेळी ते नवे असेल…..
Bharat Gogavle told this funny reason
Politics Shivsena Shinde Faction Bharat Gogawale Minister Post
Eknath Shinde MLA