नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील तब्बल ११ माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. त्याला काही दिवस उलटत नाही तोच आता ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तशी माहिती शिवसेना खासदार आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांनी दिली आहे. यासंदर्भात राऊत यांनी ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, शिवसेना नाशिक जिल्हा संप्रक प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे. चौधरी हे सध्या नागपुरात असून ते येत्या काही वेळातच शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिंदे गटात दाखल होणार आहेत.
https://twitter.com/rautsanjay61/status/1605558136823169025?s=20&t=csMWCSmqhEB0wr81W-q7CA
११ माजी नगरसेवकांबरोबरच संपर्कप्रमुखही शिंदे गटात गेल्याने नाशकात ठाकरे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात घटल्याचे बोलले जात आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व घडामोडी घडत असून याचे पडसाद निवडणुकीत दिसणार आहेत.
Politics Shivsena Samparka Pramukh Shinde Group Join