मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे आणि राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये शाब्दीक चकामक सुरू आहे. या चकामकीचा नवीन अध्याय शिवसेना सोडलेल्या नेत्यांच्या कामगिरीवरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्य निमित्ताने पूर्ण झाला.
शिवसेना चिन्ह आणि पक्षाचे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यासून भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. विशेषत: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे हे दोघेही ठाकरे कुटुंबीय तसेच मविआवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये. नितेश राणे यांचा हसणारा एक व्हिडिओदेखील मधल्या काळात बराच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ‘पुणे येथील एका सभेत अजित पवार यांनी राणेंना पराभवाची आठवण करुन दिली होती.
नारायण राणेंना तर बाईने पाडले, असे म्हणत अजित पवारांनी त्यांना हिणवले होते. वडीलांवरील त्या टीकेला उत्तर देत आमदार नितेश राणेंनी थेट सभागृहात चॅलेंज देत शिवसेना सोडल्यानंतर नेत्यांचा पराभव होतो, असा खोटा प्रचार केला जातोय. शिवसेना सोडलेल्या सर्वच नेत्यांची अवस्था वाईट नाही, असे वक्तव्य केले. तसेच शिवसेना सोडल्यानंतर विजयी झालेल्या नेत्यांचा इतिहासदेखील सांगितला.
विजयी उमेदवारांचा इतिहास
शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणे यांनी २००५ मध्ये निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत त्यांनी विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले होते. तसेच आज सभागृहात असलेले कालिदास कोळंबकर, शंकर कांबळी, गणपत कदम, सुभाष बणे, विजय वडेट्टीवार यांनीदेखील भरघोस मताने विजय मिळविला आहे. शिवसेना सोडलेल्यांपैकी शाम सावंत सोडल्यास विनायक निम्हण, माणिकराव कोकोटे, प्रा. नवले या सर्वांनी विजय मिळविला असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.
पुण्यात येऊन बारा वाजवीन
अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देत नारायण राणे म्हणाले, ‘माझ्या नादाला लागू नका, पुण्यात येऊन बारा वाजवीन.’ राणे यांच्या इशाऱ्यावर अजित पवारांनी ‘स्वागत आहे’ असे म्हणत डिवचले आहेत.
Politics Shivsena Left Leaders Win Election History