मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपने मैत्रीचा हात पुढे केला तरी ‘आम्ही भाजपबरोबर हातमिळवणी करणार नाही’, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. आज ते येथे माध्यमांशी बोलत होते.
कधीकाळी भाजप-शिवसेना हे दोन्ही पक्ष राज्याच्या राजकारणात मोठा भाऊ-लहान भाऊ याप्रमाणे होते. दोघांचीही युती अभेद्य होती. परंतु, मधल्या काळात दोन्ही पक्षातील श्रेष्ठींमध्ये प्रचंड अंतर निर्माण झाले. त्याचा परिणाम युती तुटण्याच्या स्वरूपात दिसून आला. शिवसेनेने त्यांच्या पारंपरिक मित्राला दूर सारत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली. तेव्हापासून दोन्ही बाजूने एकमेकांवर शाब्दीक हल्ले सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने मैत्रीचा हात पुढे केला तरी हातमिळवणी करणार नाही, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपवर टीका करताना ते म्हणाले,‘ शिवसेना फोडून भाजपने मोठा गुन्हा केला आहे. राज्याची जनता या वेदना कधीही विसरणार नाही. हा महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला ‘बाण’ असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी केले. हे महाराष्ट्रातील जनता आणि शिवसेना विसरणार नसल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारा पक्ष केंद्रीय तपास यंत्रणा आणि पैशाचा वापर करुन भाजपने फोडला आहे. हा महाराष्ट्र राज्यावर केलेला आघात असल्याचे राऊत म्हणाले.
मनसेवर टीका
महाराष्ट्रात प्रमुख पदावर काम करणारे सगळेच लोक हे शिवसेनेतच होते. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे नसते तर आपण कुठे असतो याची उजळणी आणि याचं आत्मचिंतन प्रत्येकानं केलं पाहिजे, असे म्हणत संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनी टीका केली. तसेच मूळ शिवसेना जागेवरच असल्याचेही ते म्हणाले.
Politics Shivsena BJP Alliance MP Sanjay Raut