मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे गटाकडून नवरात्रीच्या उत्सवातच युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये गटातील नेत्यांच्या मुलांनाच स्थान देण्यात आले आहे. गटाकडून युवा सेना प्रमुखपदी अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर गटाने युवकांची नेमणूक केली आहे.
युवा सेनेची कार्यकारणी अशी
उत्तर महाराष्ट्र :
अविष्कार भुसे
मराठवाडा :
अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील
कोकण :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे
पश्चिम महाराष्ट्र :
किरण साली, सचिन बांगर
कल्याण भिवंडी :
दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक
ठाणे, नवी मुंबई व पालघर :
नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे
मुंबई :
समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे
विदर्भ :
ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील
Politics Shinde Group Yuva Sena Appointments