मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येत्या १५ ऑगस्ट रोजी म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यदिनी शासकीय ध्वजारोहण होते. त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे ध्वजारोहण करीत असतात. मात्र, शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये पालकमंत्री पदावरुन मोठा वाद आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वात ९ मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी त्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. त्यातच ध्वजारोहण ४ दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर राज्य सरकारने यादी जाहीर केली. मात्र, पुणे आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन मोठा वाद आहे. त्यावर आता तोडगा काढण्यात आला आहे.
राज्य सरकारने १५ ऑगस्टला ध्वजारोहणासाठी यादी जाहीर केली आहे. पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ज्या जिल्ह्यांची नावे नाहीत तेथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचा गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर या गटाला मंत्रिपद मिळाले. पण, त्यांच्यावर अद्याप पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अखेर आता ही यादी जाहीर झाली. मात्र, काही तासांमध्येच त्यात बदल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे असतांना ते धुळे येथे ध्वजारोहण करणार आहे. तर नांदेड व धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे नाशिकला ध्वजारोहण करतील. अमरावतीला छगन भुजबळ हे ध्वजारोहण करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदाचे वाटप झालेले नाही. मात्र, १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार? याबाबत आता सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. २८ जिल्ह्यांमध्ये मंत्री ध्वजारोहण करणार आहेत, तर ७ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. या यादीत भुसे नाशिक व महाजन धुळे असा बदल होवू शकतो.
पुणे आणि रायगडचा बदल
पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे ध्वजारोहण करणार की पालकमंत्री चंद्रकांत पाटील हा पेच होता. तर, रायगडमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना शिंदे गटाचा विरोध आहे. रायगडला जिल्हाधिकारी तर पुण्यात चंद्रकांत पाटील हे ध्वजारोहण करणार होते. मात्र, अजित पवार गटाने विरोध केला. शिवाय भाजपनेही ताकद लावली. अखेर ध्वजारोहणाची यादी आता बदलण्यात आली आहे. त्यानुसार, पुण्यात राज्यपाल रमेश बैस हे ध्वजारोहण करणार आहेत. तर, रायगडमध्ये चंद्रकांत पाटील हे ध्वजारोहण करतील.
बघा, कुठल्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार
देवेंद्र फडणवीस – नागपूर
अजित पवार – कोल्हापूर
छगन भुजबळ – अमरावती
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
चंद्रकांत पाटील – रायगड
दिलीप वळसे पाटील – वाशिम
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
रविंद्र चव्हाण – ठाणे
हसन मुश्रीफ – सोलापूर
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
उदय सामंत – रत्नागिरी
अतुल सावे – परभणी
संदीपान भुमरे – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराज देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ
धनंजय मुंडे – बीड
धर्मराव आत्राम – गडचिरोली
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
संजय बनसोडे – लातूर
अनिल पाटील – बुलढाणा
आदिती तटकरे – पालघर
Politics Shinde Fadnavis Pawar Dispute Flag Hosting List Change
Pune Raigarh Raigad Guardian Minister