नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन वेगवेगळ्या पक्षाचे दोन नेते एकत्र भेटले की राजकीय चर्चा सुरू होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची गडकरी यांच्या घरीच भेट घेतली. आज शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्या भेटीत शेती विषयावर चर्चा झाली असे कळते, विशेष म्हणजे महिनाभरात दुसऱ्यांदा या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीने चर्चेला उधाण आले असून राजकीय महत्त्वही प्राप्त झाले आहे.
गेल्या दीड महिन्यात नागपुरात शरद पवार आणि नितीन गडकरी यांची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी दि. १२ फेब्रुवारीला शरद पवार नागपूर आणि वर्ध्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळीही परत जाताना विमानतळावर शरद पवार आणि नितीन गडकरी यांची भेट झाली होती, खरे म्हणजे आजच्या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये ऊसशेती, साखर कारखानदारी आणि शेतकरी या विषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा राजकीय खलबत झाल्याचे बोलल्या जात आहे.
आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दीड महिन्यात दुसऱ्यांना नागपूरच्या दौऱ्यावर आले. या दोन्ही दौऱ्यात शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत विविध विषयावर चर्चा केली. आज पुन्हा १ एप्रिललाच पवार हे गडकरी यांच्या घरी गेले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली.
शरद पवार भाजपच्या अनेक नेत्यांवर नेहमीच टीकास्त्र सोडतात. मात्र या उलट ते नितीन गडकरी यांचे नेहमी कौतुक करतात. नाही. विशेषतः गडकरी यांनी विदर्भात ऊसशेती आणि साखर कारखानदारीबाबत केलेल्या कामाचे शरद पवार वारंवार कौतुक करतात. सन १९९५ मध्ये नितीन गडकरी यांनी पूर्ती समूहाच्या बॅनरखाली विदर्भात साखर उद्योगात पदार्पण केले. त्यामुळे पवार व गडकरी यांच्या चर्चेचा विषय ऊसशेती, शेतकरी आणि साखर कारखानदारी असला, तरी राजकारणातले दोन दिग्गज नेते भेटल्यावर राजकीय चर्चा होते.
या दोन्ही नेत्यांमध्ये दीड महिन्यातल्या आजच्या दुसऱ्या भेटीवरून राजकीय चर्चा सुरू झाली. देशाच्या राजकारण शरद पवार एकीकडे मोदी सरकार विरोधात विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी दिल्लीत बैठकाही घेत आहेत. तर दुसरीकडे मोदी सरकारचे वरिष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक आणि भेटीगाठींचेही सत्र सुरु आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर राजकीय विश्लेषक याचा वेगवेगळा अर्थ काढत आहेत.
#वसंतदादा_शुगर_इन्स्टिट्यूट, पुणे च्या नागपूर उपकेंद्रासाठी प्रस्तावित जागेला भेट देण्यासाठी नागपूरमध्ये आलेले ज्येष्ठ नेते श्री शरद पवार जी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. @PawarSpeaks @nitin_gadkari @InfoNagpur pic.twitter.com/NsvOtMZHmF
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 1, 2023
Politics Sharad Pawar Nitin Gadkari Meet within Month