बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्याचे बिडकरांनी जंगी स्वागत केले. राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधील बंडानंतर बीडमधली शरद पवार यांची ही पहिलीच सभा होती. यासभेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी बीडकर निष्ठेच्या बाबतीत तडजोड करत नाहीत असे सांगत त्यांचे कौतुकही केले.
या सभेत शरद पवार यांनी माझं वय झालं म्हणतात, तुम्ही माझं काय बघितलं. ठीक आहे तुम्हाला सत्तेच्या बाजूने जायचं आहे. पण निदान आयुष्यात ज्यांच्याकडून तुम्ही काही घेतलं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवण्याचा प्रयत्न करा. असे जर केलं नाही तर लोक तुम्हाला योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असे सांगत अजित पवार गटावर निशाणा साधला. या सभेत त्यांनी केंद्र सरकारवर टीका करतांना सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकांना आवरायची वेळ आल्याचे सांगितले.
Sharad pawar beed sabha