मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या चर्चेत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी सांगितले की, जर त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर ते अजित पवार यांना त्यांचे पद देतील.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज एका कार्यक्रमाला उपस्थित होते. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश घेतल्यास मला खूप आनंद होईल. जर मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर मी अजित पवारांना या पदासाठी पुढे करेन, असे त्यांनी सांगितले, यावेळी आठवले म्हणाले की, अजित पवार हे भाजपमध्ये जातील असे मला वाटत नाही.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले की, मी माझे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. कारण संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रदीर्घ दौऱ्यामुळे तब्ब्येत बरी नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो, असा अंदाज बांधू नका, असे पवार म्हणाले होते. त्यावर आठवले म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. त्यांनी अजित यांना अनेक खाती आणि पदे दिली आहेत. त्यांची तब्येत बिघडली होती आणि त्यामुळेच त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अजित पवार हे भाजपमध्ये जाणार नाहीत असे मला वाटते.
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर २३ नोव्हेंबरच्या पहाटे भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, त्यांचे सरकार केवळ ८० तास टिकू शकले.
Politics RPI Ramdas Athawale on Cm post