मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटाने मोठा निर्णय़ घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला अध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड केली. याअगोदर ही जबाबदारी विद्या चव्हाण यांच्याकडे होती. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील बबन गिते यांची राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शरद पवार गटातच राहणे पसंत केले. त्यामुळे त्यांच्या कन्येली ही संधी देण्यात आली. रोहिणी खडसे यांनी विधानसभेची निवडणूक भाजपकडून लढवली होती. पण, त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजप विरोधात विरोधी भूमिका घेत अनेक आरोप केले. त्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर एकनाथ खडसे यांना विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून संधी देण्यात आली.
अशी आहे रणनिती
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. आता न्यायालयीन आणि निवडणूक आयोगातील लढाईही लढावी लागणार आहे. त्यामुळे तेथे विविध कागदपत्रे आणि शपथपत्रे, प्रतिज्ञापत्रेही सादर करायची आहेत. त्यामुळेच आता शरद पवार गटानेही विविध नियुक्ती फटाफट जाहीर करण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच, या नियुक्त्यांद्वारे ते ते नेते सक्रीय होतील आणि संघटना मजबुत करतील अशी अपेक्षा शरद पवार यांना आहे. तसेच, रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या वारसदार समजल्या जातात. त्यामुळे त्यांची नियुक्ती करुन पवारांना आणखी एक मोठा डाव खेळल्याचे बोलले जात आहे.
Politics Rohini Khadse New State President of NCP Women Wing
Jalgaon Eknath Khadse Daughter Sharad Pawar