इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क– लाल डायरीमुळे राजस्थानात खळबळ उवून देणारे माजी मंत्री राजेंद्र गुढा यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये महिन्याभरात निवडणुका जाहीर होण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत त्यांनी सत्ताधारी काँग्रेसलाच अडचणीत आणले. त्यानंतर गुढा यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. आणि आता गुढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुढा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. गुढा हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ते खास विश्वासू नेते होते. पण, त्यांनी राजस्थान सरकारवर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांना मंत्रीपदावरुन काढून टाकण्यात आले होते. राजस्थानच्या झुनझुनमध्ये झालेल्या जाहीर कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
एकनाथ शिंदे यांनी गुढा यांच्या हातात शिवधनुष्य देऊन त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, राजेंद्र गुढा यांचं शिवसेनेत स्वागत आहे. त्यांनी एक चांगला निर्णय घेतला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. यावेळी राजेंद्र सिंह गुढा यांनीही मनोगत व्यक्त केरतांना शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापांच्या विचाराने आपण काम करू. या राज्यात शिवसेना पसरवू, असा शब्द दिला.
In the presence of Chief Minister Eknath Shinde, former Congress ministers from Rajasthan joined the Shivsena
Politics Rajasthan Red Diary Fame Rajendra Gudha Join Shivsena Shinde