मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यात हॉटेल ट्रायडेंटमध्ये भेट झाली असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नीलम गोऱ्हे मागच्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंसोबत भेट घेतल्याने नेमका या भेटीमागील उद्देश काय, याविषयी अंदाज लावले जात आहेत.
डॉ. नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या सध्या उपसभापती आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटात नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्या ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. नीलम गोऱ्हे यांच्या निकटवर्तीय शर्मिला येवले आपल्या समर्थकांसह युवतीसेनेला रामराम करण्याच्या तयारी आहेत. अशात नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांसोबतची भेट महत्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांची भेट झाली तेव्हा भाजप नेते आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही तिथे उपस्थित होते. ओम बिर्ला मुंबई आहेत.या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिंदे-गोऱ्हे एकत्र दिसल्याने एकच चर्चा रंगली आहे. यावेळी खासदार गजानन कीर्तिकर, खासदार राहुल शेवाळेदेखील तिथे उपस्थित होते.
हा निव्वळ योगायोग
ओम बिर्ला मुंबई दौऱ्यावर आहेत. अशावेळी त्यांच्याशी काही बाबींवर चर्चा करायची होती. त्यासाठी मी तिथे गेले होते. तेव्हा मुख्यमंत्रीही तिथे होते. हा निव्वळ योगायोग होता. ही केवळ सदिच्छा भेट होती. यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असे नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/neelamgorhe/status/1593900391284056065?s=20&t=NBsvCEgnzEDocnfNNUo0Zw
Politics Neelam Gorhe Meet CM Eknath Shinde Shivsena