येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात जाहीर सभा होत आहे. याद्वारे पवार यांनी त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ फोडला आहे. बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पवार काय बोलणार, भुजबळ यांच्याविषयी काय टीका करणार की गौप्यस्फोट करणार याची सर्वांना उत्सुकता आहे. जाहीर सभा सध्या सुरू झाली आहे.
शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्या नेतृत्वात बंडखोरी करुन मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या छगन भुजबळ यांचा येवला हा मतदारसंघ आहे. येवल्याचे प्रतिनधीत्व भुजबळ करीत असल्याने त्यांच्याच मतदारसंघात त्यांना घेरण्याची रणनिती पवार यांनी आखली आहे. अजित पवार यांच्या गटातील नेत्यांच्या सर्वत मतदारसंघांमध्ये सभा घेण्याचे पवार यांनी जाहीर केले आहे. त्याची सुरुवात येवला येथून होत आहे. नाशिक जिल्ह्यात आज पाऊस होत आहे. मुंबई येथून निघालेल्या शरद पवार यांचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे. भर पावसातही पवार समर्थकांचा उत्साह आहे.
येवल्यातील जाहीर सभा सुरू झाली आहे. बघा, या सभेचे हे थेट प्रक्षेपण