मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांनी स्वतंत्रपणे बैठक बोलावली. याद्वारे शक्तीप्रदर्शन करतानाच आपल्याला किती लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे हे दाखविले जाणार होते. बंडखोरी करणाऱ्या अजित पवार यांना ३२ आमदार आणि २ खासदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून आले. तर, शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बोलावलेल्या बैठकीला १६ आमदार आणि ५ खासदार उपस्थित असल्याचे दिसून आले.
उपस्थित आमदारांची नावे अशी
अनिल देशमुख
रोहित पवार
राजेंद्र शिंगणे
अशोक पवार
किरण लहमटे
प्राजक्त तनपुरे
बाळासाहेब पाटील
जितेंद्र आव्हाड
चेतन तुपे
जयंत पाटील
राजेश टोपे
संदीप क्षिरसागर
देवेंद्र भुयार
विधान परिषद सदस्य
शशिकांत शिंदे, बाबा जानी दुराणी, एकनाथ खडसे
खासदार
श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, फौजिया खान, वंदना चव्हाण