नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरगाणा तालुक्याध्यक्षाने काही गावे थेट गुजरातला जोडावी, अशी मागणी केली आहे. यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यासंदर्भात अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुलासा केला आहे. तसेच, पक्षाची अधिकृत भूमिकाही स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरगाणा तालुकाध्यक्ष चिंतामण गावीत यांनी सुरगाणा तालुक्यातील प्रश्नांबाबत मा.तहसिलदार यांच्याशी चर्चा करत असतांना तालुक्यातील काही भागात विकास होत नसल्याने तो गुजरातला जोडण्यात यावा अशी भावनिक मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरगाणा तालुकाध्यक्ष चिंतामण गावीत यांनी केलेली मागणी त्यांची व्यक्तिगत असुन महाराष्ट्र एकसंघ रहावा अशीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भुमिका आहे. कळवण- सुरगाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन पवार यांनी प्रस्तावित केलेल्या विविध विकासकामांना राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे या भागातील जनतेत सरकार विरोधात मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. या असंतोषापोटी श्री.गावीत यांनी त्यांच्या व्यक्तिगत स्तरावर हे विधान केलेले आहे.
Politics NCP on Surgana Village Gujrat Join Stand
Nashik