विशेष प्रतिनिधी, मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मोदी यांना अश्रू अनावर झाले. याप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींवर कडाडून टीका केली आहे. “मोदींचे अश्रू हे मगरीचे आहेत. आसववाहिनी गंगा पंतप्रधान मोदींच्या डोळ्यांतूनही गंगा शववाहिनी होऊन वाहिल्यानंतर पंतप्रधानांना उपरती झाली? अश्रू ढाळण्यासाठी मोदीजींनी १ लाख ३४ हजार ८० मृत्यूंची वाट का पाहिली?”, असा पडखर सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला आहे. या टीकेची मोठी चर्चा सोशल मिडीयामध्ये होत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले ट्वीट असे
आसववाहिनी गंगा पंतप्रधान मोदींच्या डोळ्यांतूनही
गंगा शववाहिनी होऊन वाहिल्यानंतर पंतप्रधानांना उपरती झाली?
अश्रू ढाळण्यासाठी मोदीजींनी १ लाख ३४ हजार ८० मृत्यूंची वाट का पाहिली?#CrocodileTears @narendramodi pic.twitter.com/O899cIrnZR
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 21, 2021