मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. या सर्व आमदारांनी नागालँडमध्ये यापूर्वीच भाजपला पाठिंबा दिला आहे. नामरी नचांग, पिक्टो, एस. तोइहो येप्थो, वाय. म्होंबेमो हूमत्सो, वाय. मानखा ओकोन्याक, ए पोंगशी फोम आणि पी लॉन्गॉन अशी या सात आमदारांची नावे आहेत. या आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याने हा शरद पवार यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्षावर दावा केला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांचे नावही जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता बहुतांश राष्ट्रवादीचे आमदार महाराष्ट्रात व नागालॅंडमधील अजित पवार यांच्याबरोबर गेले आहे. राज्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडून अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर शरद पवार यांच्या गटाकडूनही विरोधही करण्यात आला. तरी सुध्दा अजित पवार यांच्या बाजूनेच आमदार जास्त राहिले.
राज्यात अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीकडे मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती आहेत. त्यामुळे या गटाची सत्तेत ताकद वाढली आहे. त्यात नागालँडच्या आमदारांनी पाठिंबा देऊन यात भर घातली आहे. या ठिकाणी भाजपला १२ जागा मिळाल्या होत्या तर नँशनल डेमाँक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टीला सर्वाधिक २५ जागा मिळाल्या होत्या. दोघांनी मिळून सरकार स्थपान केते होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही येथे पाठिंबा दिला होता.