मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना तब्बल एका वर्षानंतर दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला आहे. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी ईडीने त्यांना अटक केली होती. अटक केल्यानंतर त्यांनी अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केला. उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. पण, आता सर्वोच्च न्यायालायने प्रकृतीच्या कारणामुळे दोन महिन्यांसाठी त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) अटक केली होती. दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी इक्बाल कासकर याच्या चौकशीदरम्यान मलिक यांचे नाव पुढे आले होते. दाऊद इब्राहिम हा रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतो. यामध्ये मलिक यांचा सहभाग असल्याचा आरोप मलिक यांच्यावर ठेवण्यात आला होता. यासंदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने (ED) धाड टाकली होती.
या कारणाने जामीन मंजूर
नवाब मलिक यांची किडनी निकामी झाली आहे. त्यावर उपचारासाठी जामीन मिळण्याची मागणी वकिलांनी न्यायालयात केली होती. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील निकालांचा संदर्भ दिला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा हा अर्ज मंजूर करत वैद्यकीय कारणासाठी दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला.
Politics NCP Leader Nawab Malik Supreme Court
Bail granted to NCP leader Nawab Malik