मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड कायमच त्यांच्या आक्रमक आणि आक्षेपार्ह विधानांसाठी चर्चेत असतात. बरेचदा ते रोषही ओढवून घेत असतात. मात्र आज ते अत्यंत भावनिक पोस्टसाठी चर्चेत आहेत. नेमके वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ते भावनिक झाल्यामुळे राजकीय विश्वाचे लक्ष वेधले गेले आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची घोषणा करत पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर झालेले संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. मात्र असे प्रसंग आव्हाडांच्या आयुष्यात वारंवार येत नाहीत. या घटनेला अगदी काहीच दिवस झालेले असताना आव्हाडांना एक भावनिक ट्वीट करून पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांचा आज (५ अॉगस्ट) वाढदिवस आहे. वाढदिवसाला लोकांच्या शुभेच्छांनी आपण भारावून जात असतो, मात्र यंदा आपण कुणालाही भेटणार नसून मोबाईल देखील स्वीच अॉफ करणार आहे, असे ट्वीट त्यांनी केले.
‘लोक किती स्वार्थी असतात हे मला उघडपणाने लक्षात आले. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात. ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात. हा अनुभव मला नवीन आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर अस्वस्थ मनाने मी कोणालाच भेटू इच्छित नाही. कृपया माफ करा. मी उद्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी भावनिक पोस्ट त्यांनी ट्वीट केली आहे.
लोकशाहीची हत्या होतेय म्हणून
देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणीपूरमधील स्त्रियांवर अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे कोणाला भेटावे असे मला अजिबात वाटत नाही. तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत. हीच माझी ताकत आहे. हीच माझी संपत्ती आहे. पण तरिही मला माफ करा. मी आज रात्री बारापासून ते उद्या रात्री बारापर्यंत स्वतःचा फोन बंद करून मी अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे, असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
politics ncp leader jitendra awhad post birthday
Mumbai Thane Tweet Social Media Celebration