जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप आणि शिंदे गटाला कडक शब्दात फटकारण्याचे काम सुरू केले आहे. खडसे म्हणाले की, “पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?” असे म्हणत शिंदे गटावर घणाघात केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं घाणेरडे राजकारण कधी झाले नव्हते. खोक्यांची भाषा कधी झाली नव्हती असेही म्हटले आहे. यासोबतच धनुष्यबाणाच्या जोरावर, बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि त्यांच्याशी धोका देऊन दुसरीकडे गेलात हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे, असे म्हणत निशाणा साधला आहे.
खडसे पुढे म्हणाले की, राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. राज्यात झालेले फेरबदल जनतेला फार काही आवडलेले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं घाणेरडं राजकारण कधी झालं नव्हतं. खोक्यांची भाषा कधी झाली नव्हती. निवडणुका विचाराने लढल्या जायच्या. अलीकडे हे सरकार पाडायच, ते पाडायचं हेच चाललं आहे” असं टीकास्त्र एकनाथ खडसे यांनी सोडलं आहे.
त्यातच आपल्या जिल्ह्यातील ५ आमदार शिंदेंच्या गटात गेले. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवली, घडवली. धनुष्यबाणाच्या जोरावर, बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि त्यांच्याशी धोका देऊन दुसरीकडे गेलात हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. राज्यातील जनता तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही” असंही खडसेंनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी असं म्हटलं आहे.
खडसे म्हणाले की, आजपर्यंतचा इतिहास आहे की एकनाथ शिंदे यांनी भाजपवर कधीही टीका केली. सरकारमध्ये असताना भाजपच्या आमदारांची कामे त्यांनी मंजूर केली. त्यामुळे त्यांचा निर्णय पूर्वीपासून भाजप सोबत जाण्याचा होता. त्याचप्रमाणे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी अनेकदा शिवसेनेवर खालच्या पातळीवरचे आरोप केले. मात्र याला जळगाव जिल्ह्यातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी कधीही प्रत्युत्तर दिले नाही. गुलाबराव पाटील यांनी कधीही गिरीश महाजन यांच्यावर टीका केली नाही. दोन्ही गोष्टींवरून असे सिद्ध होते की या बंडखोर आमदारांच्या मनात आताच नव्हे तर पूर्वीपासूनच भाजपसोबत जाण्याचा विचार होता आणि तेच आता सर्व जगाच्या समोर आलं आहे,’ असा हल्लाबोल खडसे यांनी केला होता.
खडसेंनी टीका केली की, तुम्ही २०० कोटीच काय ६०० कोटी आणले असतील पण तत्त्व आणि सत्त्व शिल्लक राहिले नाही. पण निष्ठा शिल्लक नसेल तर २०० कोटी आणले काय आणि ६०० कोटी आणले, त्याला काय अर्थ आहे? पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?” असं म्हणत टीका केली आहे. तसेच आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा आहे हा दृष्टीने काम करायचं आहे. हा मतदारसंघ पिंजून काढायचा आहे असेही खडसे यांनी म्हटले आहे.
खडसे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात मी सातत्याने ३० वर्ष निवडून आलोय आणि आता पुन्हा ६ वर्षासाठी आमदार झालोय. त्यामुळे ३६ वर्ष जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. नाथाभाऊला नाउमेद केल्याशिवाय त्यांना यश मिळणार नाही हे विरोधकांना माहिती आहे. जिल्हा बँका, जिल्हा दूध संघ अनेक ठिकाणी विरोधकांना अपयश आले असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत सारे विरोधक एकवटून नाथाभाऊला विरोध करणे हेच एकमेव काम विरोधकांकडे उरलं आहे. परंतु जोपर्यंत जनता खडसेंच्या पाठिशी आहे तोपर्यंत सारे एकत्र आले तरी या विरोधकांना यश येणार नाही असा टोलाही खडसेंनी लगावला आहे.
नाथाभाऊंनी विकास कामे केले तेव्हा तुम्हाला जाग का आली नाही? मुक्ताईनगरचे आमदार हे कोणाच्या भरोशावर निवडून गेले हे तुम्ही एक मुखाने सांगा असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. चंद्रकांत पाटील यांच्या आमदारकीविषयी आणि त्यांना निवडून आणण्याता कुणाचा वाटा होतो हे सांगताना खडसे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी त्यांना आमदार करण्यासाठी मदत केली आहे, आता उद्धव ठाकरे यांना सोडून तुम्ही एकनाथ शिंदे गटकडे गेला आहात मग गद्दारी कोणी केली? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मी गेले ४० वर्ष आमदार आहे तर चंद्रकांत पाटील यांच्या आमदारकीला केवळ तीन वर्षे झाले आहेत आणि आता अचानक करोडो रुपयांच्या गाड्या घोड्या कशा येतात, असा सवाल उपस्थित करत ओके कोणाचे आणि खोके कोणाचे हे जनतेला माहिती असल्याचे म्हणत खडसेंनी उत्तर दिले आहे.
Politics NCP Leader Eknath Khadse on Rebel Shinde Group