नाशिक – नांदगाव मतदारसंघाकडे जास्त फिरकू नका आणि आलेच तर त्यांना पाहूणचार द्या, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. त्याचा चांगलाच समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी घेतला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या शिल्पकारांमध्ये राऊत यांचा समावेश आहे. त्यामुळे आपण तयार केलेले शिल्प चांगले रहावे, याची काळजी शिल्पकाराने घ्यायला हवी, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला आहे. राऊत हे खासदार असल्याने दिल्लीत व महाराष्ट्रात राहतात. त्यामुळे नांदगावमध्ये आम्ही नक्की काय आणि किती कामे केली आहेत, हे त्यांना माहिती नाही, असेही भुजबळ म्हणाले. सामनाच्या स्थापनेपासून तर शिवसेनेच्या विस्तारापर्यंत आपण होतो, राऊत हे नंतर आले असे सांगत भुजबळ यांनी जोरदार बॅटिंग केली. बघा, त्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/467410871232843/